Share

Sanjay Raut | “बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे”, लाडक्या बहीण योजनेवरून संजय राऊतांची सडकून टीका

Sanjay Raut | "बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे", लाडक्या बहीण योजनेवरून संजय राऊतांची सडकून टीका

Sanjay Raut | विधानसभा निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू राहील की नाही? याबाबत मोठी चर्चा रंगली होती. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करून माहिती दिली आहे. अशातच आता संजय राऊत यांनी या योजनेबाबाबत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

“40 रुपयांचा लसूण 400 रुपयांवर गेला आहे. 1500 रुपये देता. जेव्हा बहीण मार्केटमध्ये जाते तेव्हा ती थैली रिकामी घेऊन येते. 1500 रुपयात काही येत नाही”, असा टोला राऊतांनी नवीन सरकारला लगावला आहे.

“भविष्यात लाडकी बहिण योजना बंद करतील. लाखो कोटींचा खर्च आहे. निवडणुकीच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले. आता निवडणुका झाल्यावर निकष लावता. आता दारूची दुकाने वाढवत आहेत. 1500 रुपयांसाठी आपल्या घरात कोणतं विष आणलं जात आहे, ते बहिणींनी पाहिलं पाहिजे” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | विधानसभा निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू राहील की नाही? याबाबत मोठी चर्चा रंगली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now