Share

‘ते’ काम अजित पवार करतायत, आपल्याला गरज नाही; उदय सामंतांनी भाजपला दाखवला आरसा!

Shiv Sena leader Uday Samant takes a dig at BJP in Pune, saying Ajit Pawar is doing the job of criticizing them.

Published On: 

Shiv Sena leader Uday Samant takes a dig at BJP in Pune, saying Ajit Pawar is doing the job of criticizing them.

🕒 1 min read

पुणे – राजकारणात मित्र कोण आणि विरोधक कोण, हे ओळखणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आलाय. महायुतीत आपण सोबत आहोत, पण ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ असा काहीसा प्रकार सुरू आहे की काय? असा प्रश्न पडलाय. निमित्त ठरलंय, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचं पुण्यातलं एक विधान. पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना सामंत यांनी चक्क आपल्याच मित्रपक्षाला, अर्थात भाजपला शालजोडीतून हाणल्या आहेत.

Shiv Sena leader Uday Samant Speech

उदय सामंत यांनी भाजपचे नाव न घेता जोरदार बॅटिंग केली. “आपला पक्ष विकासावर बोलणारा आहे. आपल्याला भाजपवर टीका करण्याची गरज नाही, कारण टीका करण्याचं आपलं काम अजित पवार (Ajit Pawar) पूर्ण करत आहेत,” असा सणसणीत टोला सामंत यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित शिवसैनिकांमध्ये एकच हंशा पिकला, पण राजकीय वर्तुळात मात्र भुवया उंचावल्या आहेत.

सामंत इतकंच बोलून थांबले नाहीत. पुण्यात ही लढाई ‘शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या आर्थिक ताकदीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आमच्या मित्रपक्षाला वाटत होतं की आम्हाला ४० उमेदवारही मिळणार नाहीत. पण आम्ही एका तासात निर्णय घेतले आणि १२० उमेदवार मैदानात उतरवले. आता पुण्याचा महापौर आमच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही,” असा उघड इशाराच त्यांनी दिला आहे.

एकीकडे भाजपसोबत नैसर्गिक युती टिकली पाहिजे असं म्हणायचं आणि दुसरीकडे “मित्रपक्ष पत्रकार परिषद घेऊन आपलं काम सोपं करत आहेत,” असं म्हणत डिवचायचं, ही उदय सामंतांची गुगली भाजपला किती झोंबणार, हे येणारा काळच सांगेल. एक मात्र नक्की, पुण्याच्या राजकारणात आता ‘दहीहंडी’ फोडण्याआधीच युतीतल्या ‘मडक्यां’ना तडे जाऊ लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही