Share

आईच्या दुसऱ्या लग्नात गिरीजा ओक झाली ‘साक्षीदार’; पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे रडली अभिनेत्री!

Actress Girija Oak opens up about signing as a witness for her mother’s second marriage and her emotional struggles.

Published On: 

Actress Girija Oak opens up about signing as a witness for her mother's second marriage and her emotional struggles.

🕒 1 min read

मुंबई – समाज काय म्हणेल याचा विचार न करता एखाद्या लेकीने आईच्या दुसऱ्या लग्नात चक्क साक्षीदार म्हणून सही केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? हे ऐकायला थोडं फिल्मी वाटू शकतं, पण हे घडलंय आपल्या लाडक्या ‘नॅशनल क्रश’च्या आयुष्यात. अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) हिने नुकताच आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला असून, तिने सांगितलेला किस्सा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.

सध्या सोशल मीडियावर गिरीजाचा ‘दिल के करीब’ या कार्यक्रमातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात तिने आपल्या पालकांचा घटस्फोट आणि त्यानंतरचे आयुष्य यावर भाष्य केलंय. गिरीजा लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि काही वर्षांनी आईनेही नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आईच्या लग्नात स्वतः गिरीजाने साक्षीदार म्हणून सही केली होती. “आईने कोपऱ्यात पडून न राहता स्वतःचं सुख निवडलं, याचा मला आजही अभिमान आहे,” असं गिरीजा (Girija Oak) सांगते.

Girija Oak Interview

गिरीजाने यावेळी मनातील एक सल सुद्धा बोलून दाखवली. ती म्हणाली, “इंडस्ट्रीत कामाच्या वेळा विचित्र असतात. अनेकदा १२-१६ तास काम करून घरी आल्यावर दारात कोणीच नसायचं. अशा वेळी आई जवळ असती तर निदान गरम जेवण मिळालं असतं, कुणीतरी हसून दार उघडलं असतं,” असे विचार मनात यायचे. आईने तिचं जग नव्याने उभं केलं याचा आनंद होताच, पण त्याच वेळी ‘ती माझ्यासोबत का नाही?’ ही भावनाही मनाला कुरतडत होती, हे गिरीजाने प्रांजळपणे कबूल केलंय.

इतकेच नाही तर, लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतरही अनेकदा एकटेपणा जाणवल्याची कबुली तिने (Girija Oak) दिली. सध्या गिरीजाची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय आणि माय-लेकीच्या या अनोख्या नात्याचं नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या