Share

राज ठाकरेंच्या हाती धक्कादायक पुरावे; भाजपच्या ‘बिनविरोध’ पॅटर्नची होणार पोलखोल?

Raj Thackeray to expose BJP’s unopposed election pattern with video evidence and call records in upcoming rallies.

Published On: 

Devendra Fadnavis suddenly meets Raj Thackeray

🕒 1 min read

पुणे – लोकशाहीत निवडणुका लढल्या जातात, पण निकाल लढण्याआधीच लागला तर? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हाच प्रश्न अनेकांना पडलाय. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह राज्यात तब्बल ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, आणि यात सर्वाधिक ४४ उमेदवार एकट्या भाजपचे आहेत. पण हा विजय जनतेचा की ‘डिल’चा? याचाच फैसला करण्यासाठी आता खुद्द राज ठाकरे ( Raj Thackeray ) मैदानात उतरणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या प्रसिद्ध ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलने या बिनविरोध पॅटर्नची पोलखोल करण्याच्या तयारीत आहेत. ठाणे आणि कल्याणमधील मनसे नेत्यांनी कॉल रेकॉर्डिंग्ज आणि व्हिडीओचे पुरावे थेट ‘शिवतीर्थ’वर सुपूर्द केले आहेत. उमेदवारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून किंवा थेट धमकावून अर्ज मागे घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही अचानक माघार घेतल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती.

Raj Thackeray to expose BJP’s unopposed election pattern

मनसे फक्त सभांमधून आवाज उठवणार नाहीये. या बिनविरोध प्रकरणाला थेट कायदेशीर आव्हान देण्याची तयारी पक्षाने केली आहे. सूत्रांनुसार, येत्या सोमवारी मनसे नेते या प्रकरणाविरोधात कोर्टात धाव घेणार आहेत, शिवाय राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तक्रारही दाखल करतील.

अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि राजू पाटील यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “बाळासाहेबांसोबत मी अनेक निवडणुका पाहिल्या, पण माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीच पाहिली नाही,” अशा शब्दांत त्यांनी या पॅटर्नवर ताशेरे ओढले आहेत.

कोणाचे किती उमेदवार बिनविरोध

भाजप: ४४

शिवसेना (शिंदे गट): २२

राष्ट्रवादी (अजित पवार गट): २

इतर /अपक्ष): २

मतदानाला १२ दिवस बाकी असतानाच हे निकाल लागलेत. त्यामुळे आगामी सभांमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) कोणता नवीन व्हिडीओ ‘प्ले’ करतात आणि भाजपच्या या रणनीतीवर काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!