🕒 1 min read
सिंधुदुर्ग: राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा वादग्रस्त जीआर रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते, ज्यामध्ये उद्धव ठाकरेही सहभागी होणार होते.
भाजप खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांना थेट ५ प्रश्न विचारले आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन ५ जुलैला विजयी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, यावर राणेंनी “विजयी मेळावा म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे?” असा बोचरा सवाल करत टोला लगावला आहे.
Narayan Rane Slams Uddhav Thackeray Over Hindi GR
१. उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते?
२. मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले?
३. मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले, मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ?
४. महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?
५. मराठी बद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे राणे म्हणाले.
सरकारने जीआर मागे घेतल्याने मराठी भाषेच्या समर्थकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी यावरून आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राणेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे गट काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, तहात हरायचं नाही; हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल
- नोकरीच्या शोधात? महाराष्ट्र बँक, BEML, IRDAI सह अनेक ठिकाणी भरती सुरू; लगेच अर्ज करा!
- छगन भुजबळांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल; युट्युब चॅनेलविरोधात नाशिक पोलिसांत गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now