Share

लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, तहात हरायचं नाही; हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल

Marathi actor Hemant Dhome warns against complacency after Hindi language GR withdrawn.

Published On: 

Marathi actor Hemant Dhome warns against complacency after Hindi language GR withdrawn.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेला वाद आता तात्पुरता निवळला आहे. राज्य शासनाने रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी सक्तीचा जीआर (शासन निर्णय) मागे घेण्याचा निर्णय घेतला.

या ‘विजयाच्या’ पार्श्वभूमीवर, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे ( Hemant Dhome ) याने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “ही लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, या तहात हरायचं नाही हे मनाशी बांधून मराठीच्या वाढीसाठी काम केलंच पाहिजे”

Hemant Dhome says Hindi GR withdrawal is not a victory

ढोमे पुढे म्हणाले, “मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे. दूरदृष्टी असणाऱ्या सर्व मराठी प्रेमींना याची पूर्ण कल्पना आहे… स्थलांतरित लोकांची भाषा महाराष्ट्राने नव्हे, तर इथे येणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्राची ‘मराठी’ शिकण्याची गरज आहे.” केवळ भाषेवर लक्ष केंद्रित न करता, “मराठी भाषेसोबत आता मराठी शाळा अभिजात करणं ही काळाची गरज आहे,” यावरही त्यांनी भर दिला.

जीआर रद्द करण्याच्या शासनाच्या घोषणेवर बोलताना ढोमे यांनी म्हटले आहे की, ही तात्पुरती सवलत आहे आणि समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे ही लढाई थांबलेली नाही. “आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील यासाठी ही चळवळ चालूच ठेवली पाहिजे,” असे आवाहन ढोमे ( Hemant Dhome ) यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही