Share

‘काय करायचं ते करा’ म्हणत शिवसृष्टी गेटवर लघुशंका; छिंदम, कोरटकर, सोलापूरकरनंतर आता ‘शिवद्रोही’ कुलकर्णीची नवी भर!

Amol Kulkarni caught urinating on the Shivsrushti gate board in Pune. FIR filed. Another insult to Chhatrapati Shivaji Maharaj after Prashant Koratkar,Shripad Chindam & Rahul Solapurkar.

Published On: 

"Caught Peeing on Shivsrushti Gate: Amol Kulkarni the Latest 'Shivdrohi' After Koratkar, Chindam & Solapurkar!"

🕒 1 min read

पुणे – पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका केल्याच्या प्रकाराने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुण्यातील अमोल अरुण कुलकर्णी (वय ५९) ( Amol Kulkarni ) याच्यावर आणि त्यांच्या पत्नी स्नेहा कुलकर्णी (वय ५७) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना पहाटे घडली. तक्रारदार नयनाथ अमराळे आणि त्यांचा मित्र अभिजीत सितापुरे हे नवले ब्रिजकडून परतत असताना, त्यांनी शिवसृष्टी गेटसमोर एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना पाहिले. ही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील सूचना फलकावर लघुशंका करत होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी शेजारी उभ्या होत्या. ही संपूर्ण घटना अक्षय गायकवाड यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे.

Amol Kulkarni Booked for Urinating at Shivsrushti Gate

तक्रारदाराने विचारणा केल्यानंतर त्या व्यक्तीने आपले नाव अमोल अरुण कुलकर्णी असल्याचे सांगितले आणि शेजारी असलेल्या त्यांच्या पत्नीने उर्मटपणे “काय करायचं ते करा” अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि दोघांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकारामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. याआधी नागपूरच्या प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याकडून शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वर्तन केल्याची उदाहरणं समोर आली होती. आता अमोल कुलकर्णी याच्या कृतीने पुन्हा एकदा समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी करत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही