🕒 1 min read
मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तेसाठी पैशाचा वापर करण्याच्या आरोपांची चर्चा रंगली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसलेले’ म्हणून गंभीर टीका केली आहे. त्यांचा आरोप आहे की, अजित पवार यांचे राजकारण केवळ सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता यावर आधारित आहे आणि ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत.
या प्रकरणात, राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाण म्हणाले, ”लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका करण्याची लायकी नाही. त्यांनी लक्ष्मण हाकेंना ‘ढेकूण’ आणि ‘देशी दारूचे ब्रँड अॅम्बेसिडर’ असेही संबोधले. सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केलं की, जर लक्ष्मण हाके अशा प्रकारे टीका करत राहिले तर महाराष्ट्रात त्यांना फिरणे कठीण होईल, असा इशाराही दिला आहे.
Suraj Chavan warns Laxman Hake
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनीही हाकेंचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ”तू ओबीसीसाठी नेमकं काय केलं? तुझ्याकडे असलेली गाडी स्वतः घेतली की जनतेनं दिली, तू खरं जनतेला सांग. प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट गमावणारा स्वतःला OBC नेता म्हणवतोस? अजितदादांवर बोलण्याआधी स्वतःची औकात पाहावी. हाके भूंकत राहिला तर तर मीही त्याला त्याच्या औकातीत उत्तर देईन. हाके तुझ्या अंगावर अंतर्वस्त्रही शिल्लक ठेवणार नसल्याचे मिटकरी म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- लक्ष्मण हाकेंनी औकात पाहून अजितदादांवर बोलावं; हाकेंच्या टीकेला अमोल मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तर
- ‘काय करायचं ते करा’ म्हणत शिवसृष्टी गेटवर लघुशंका; छिंदम, कोरटकर, सोलापूरकरनंतर आता ‘शिवद्रोही’ कुलकर्णीची नवी भर!
- “बारामतीत येतोय, दम असेल तर आडवून दाखवा!” लक्ष्मण हाकेंचे अजित पवार गटाला थेट आव्हान









