Share

हार्दिक-शुभमन यांच्यात 36 चा आकडा? गिलच्या एका पोस्टने केला मोठा खुलासा, म्हणाला…

After a viral video from the IPL 2025 Eliminator sparked rumours of a rift, Shubman Gill shared a heartfelt post with Hardik Pandya saying everything is fine.

Published On: 

Is Hardik-Shubman the number 36? Gill's post made a big revelation, he said...

Shubman Gill and Hardik Pandya : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यानंतर शुभमन गिल (Shubman Gill) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यातील वादाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नाणेफेकीदरम्यान गिलने हार्दिकच्या हस्तांदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होतं. यानंतर गिल बाद झाल्यावर हार्दिकच्या उत्सवाने ही चर्चा अधिकच पेटली.

गुजरात टायटन्सच्या गिलला पहिल्याच षटकात फक्त 1 धावांवर ट्रेंट बोल्टने बाद केलं. पंचांचा निर्णय नाकारत गिलने DRS घेतलं, आणि त्यावेळी हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली.

Gill made a big revelation in one of his posts, saying…

यावर आता स्वत: शुभमन गिलने सोशल मीडियावर पोस्ट करत वातावरण शांत केलं. त्याने हार्दिक पांड्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं, “आमच्यात प्रेमाशिवाय दुसरे काहीच नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका.” हार्दिकने देखील ही पोस्ट “Always Shubhu Baby…” म्हणत शेअर करत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, आज क्वालिफायर-2 चा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाणार असून, विजेता संघ 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत अंतिम फेरी खेळेल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही