Share

Chandrakant Patil | जयंत पाटलांच्या शपथविधी बाबतच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे गौप्यस्फोट…”

🕒 1 min readChandrakant Patil |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या भल्या पहाटे शपथविधीबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Patil |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या भल्या पहाटे शपथविधीबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे.

‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते’, असे वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे”, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“असे गौप्यस्फोट त्या त्या वेळी का केले जात नाही. उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही”, अशी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचा दावा फेटाळून लावला आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अलीकडे राज्यातील असे नेते झाले की लहान वयात त्यांनी विश्वास जपला ते माहिती नसताना काही बोलत नाहीत . माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!