Manoj Jarange | जालना: देशामध्ये आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी झटत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही आणि घरी देखील जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
अशात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासह त्यांच्या कुटुंबानेही दिवाळी साजरी केली नाही. जेव्हा पप्पा घरी येतील, जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा आम्ही दिवाळी साजरी करू, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मुलाने दिली आहे.
Shivraj Jarange commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मुलगा शिवराज म्हणाला, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, ही अत्यंत दुखद बाब आहे.
त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे, हे सर्वात मोठं दुःख आहे. ज्या दिवशी पप्पा (Manoj Jarange) घरी येतील आणि ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, त्या दिवशी आमची मोठी दिवाळी असेल.”
Manoj Jarange’s wife comments on Maratha reservation
मराठा आंदोलक मनोज जरांगे दिवाळी साजरी करण्यासाठी घरी गेले नाही. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पत्नी अत्यंत भावुक झाली.
त्या म्हणाल्या, “दिवाळीसाठी त्यांनी घरी असावं, असं मला वाटतं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असत तर ते नक्कीच घरी आले असते. ते घरी असते तर आम्हाला अत्यंत आनंद झाला असता.”
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला.
त्यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
त्यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर राज्य सरकारने या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. परंतु मनोज जरांगे यांनी त्यांना दोन जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.
सरकार 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल, विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | गोविंद बागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुउपस्थित; सुप्रिया सुळे म्हणतात…
- Sanjay Raut | अयोध्येतील राम मंदिर उभं करण्यात भाजपचं योगदान नाही – संजय राऊत
- Bacchu Kadu | सत्तेत असताना विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी एक सुद्धा मोठा निर्णय घेऊ शकले नाही – बच्चू कडू
- Uddhav Thackeray | PM मोदींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची दुःखद कहाणी समजून घ्यावी; ठाकरे गटाचा हल्लाबोल
- Raisins Benefits | बदलत्या वातावरणात भिजवलेल्या मनुकांचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे