Dilip Walse Patil | राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय? दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Dilip Walse Patil | मंचर: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडलेले असून दोन्ही गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत. अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी शरद … Read more

Published On: 

Dilip Walse Patil | मंचर: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडलेले असून दोन्ही गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत.

अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची मंचरमध्ये भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Dilip Walse Patil met Sharad Pawar a few days ago

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले होते.

त्यानंतर आज ते (Dilip Walse Patil) शरद पवार गटातील नेते अमोल कोल्हे यांना भेटले आहे. दिवाळीनिमित्त त्यांची ही भेट झाली असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शरद पवार गटात सामील होणार का? अशा चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चाललं आहे? असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी 10 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडण्यापूर्वी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)  शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते. शरद पवारानंतर वळसे पाटील आता अमोल कोल्हे यांना भेटले आहे.

त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही