Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; घेतला भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय

Maratha Reservation | मुंबई: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन (Maratha Reservation) संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे केली आहे.

जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार (Maratha Reservation) नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली.

याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाचं नेतृत्व मनोज जरांगे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण हक्क परिषद देत याबाबत ठराव मांडण्यात आला आहे.

The Maratha community has decided not to vote for Chhagan Bhujbal

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं म्हणजे मागच्या दारातून आरक्षण (Maratha Reservation) देण्यासारखं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या विधानानंतर मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आला होता. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील मराठा समाजाने बहिष्कार टाकण्यासाठी ठराव मांडला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध दर्शवला होता. त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात आंदोलन सुरू आहे.

मराठा समाजाला टिकणारं  आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. मात्र, जरांगे यांनी सरकारला ही मुदत देण्यास नकार दिला.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं नाही तर मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.