Share

Sharad Pawar | माझी जात कोणती? हे जगाला माहितीये; व्हायरल ओबीसी दाखल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा कथित जातीचा दाखला देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी जात कोणती? हे संपूर्ण जगाला माहित आहे, असं … Read more

Published On: 

Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता.

यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा कथित जातीचा दाखला देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी जात कोणती? हे संपूर्ण जगाला माहित आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

I don’t want to hide my caste – Sharad Pawar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मी जातींच्या आधारावर कधीच राजकारण आणि समाजकारण केलं नाही. यापुढे देखील मी (Sharad Pawar) कधीच जातीवर राजकारण करणार नाही.

मी माझा (Sharad Pawar) दाखला बघितला आहे. मी जेव्हा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत होतो, तेव्हाचा तो दाखला आहे. तो दाखला खरा आहे.

परंतु, दुसरा इंग्रजीतला खोटा दाखला दाखवून काही लोकांनी तो सोशल मीडियावर फिरवला आहे. त्यामध्ये ओबीसी असा उल्लेख आहे. मात्र, माझी जात कोणती? हे संपूर्ण जगाला माहित आहे. कारण मी माझी जात लपवू इच्छित नाही.”

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

यावेळी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची भावना अत्यंत तीव्र आहे.

त्यामुळे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्ही लोकांच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतो. परंतु, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install