Manoj Jarange | 75 वर्षात मराठा समाजासाठी कुणी काय केलं? हे सर्वांसमोर मांडणार – मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यभर दौरे करणार आहे. उद्यापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

मराठा समाजासाठी 75 वर्षात कुणी काय केलं आहे? हे सर्वांसमोर मांडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

Will serve the Maratha community as a servant – Manoj Jarange

मुंबईमध्ये आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मराठा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी 75 वर्षात कुणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

सेवक म्हणून मराठा समाजाची सेवा करणार, त्याचबरोबर मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं देखील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घ्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाची मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील मराठा समाजाने बहिष्कार टाकण्यासाठी ठराव मांडला आहे. या निर्णयानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये पुन्हा वाद निर्माण होईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.