Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा उतरले मैदानात; करणार आजपासून राज्यभर दौरे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

राज्य शासनाने केलेल्या विनंतीनंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जरांगे (Manoj Jarange) यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

मात्र, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.

Manoj Jarange will start his Maharashtra tour from today

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालवली होती.

त्यामुळे उपोषण स्थगित केल्यानंतर लगेचच ते रुग्णालयात दाखल झाले होते. अशात त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

आजपासून (15 नोव्हेंबर) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे त्यांची आज सभा होणार आहे.

तब्बल 125 एकर शेतामध्ये सभेची जय्यत तयारी सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) आज पासून राज्यभर दौरे करणार आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी काल मुंबईमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मराठा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठा समाजाची सेवक म्हणून सेवा करणार, त्याचबरोबर मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe