PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेतील 15 व्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या योजनेचा (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जारी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

Farmers have received 14 installments of PM Kisan Yojana

शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) 14 हप्ते मिळाले आहे. यानंतर शेतकरी या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

अशात शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांना आज या योजनेतील पंधरावा हप्ता मिळणार आहे. परंतु, काहीच शेतकऱ्यांना या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळणार आहे.

कारण या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार कार्ड लिंक आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य होते.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, त्यांनाच या योजनेच्या (PM Kisan Yojana) पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहे. या योजनांमध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM Kisan Yojana).

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तब्बल 14.50 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.