Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याबाबत अंदाज लावणं कठीणचं नाही तर अशक्य झालं आहे.
अशात काल पवार कुटुंबाने बारामतीतील गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीनिमित्त गोविंद बागेत एकत्र येतं.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? असा सवाल उपस्थित झाला होता. अशात अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या.
परंतु, रात्री 8 च्या सुमारास अजित पवार सहकुटुंबासह या कार्यक्रमात दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की काय सुरू आहे? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra will have only two leaders in future – Sanjay Raut
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मी (Sanjay Raut) शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना ओळखतो.
शरद पवार आणि अजित पवार तुम्हाला कितीही एकत्र दिसले, तरी 2024 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहणार आहे. त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार होते. शरद पवार आज देखील आपल्यासोबत आहे. त्यावेळी या दोनच नेत्यांचं राजकारण होतं.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “आज शरद पवार पुन्हा एकदा मोठ्या संकटातून सावरत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते नेतृत्व करत आहे.
तर बाळासाहेब ठाकरे आता हयात नाही. परंतु, त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे निघाले आहे.
महाराष्ट्रात यापुढे तुम्हाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच राजकारण यशस्वी झालेलं दिसेल. शरद पवार आणि अजित पवार दोघांचंही मैदान एकच आहे. मात्र, बारामती शरद पवार जिंकतील. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील शरद पवार यांचचं नेतृत्व असेल.
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता
- Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा उतरले मैदानात; करणार आजपासून राज्यभर दौरे
- Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता
- Manoj Jarange | 75 वर्षात मराठा समाजासाठी कुणी काय केलं? हे सर्वांसमोर मांडणार – मनोज जरांगे
- Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; घेतला भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय