Share

Sushma Andhare | संजय राऊतांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी ‘निष्ठा’ दिवस – सुषमा अंधारे

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे समर्थक त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाले आहे. अशात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जरा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुकवर खास … Read more

Published On: 

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे समर्थक त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाले आहे.

अशात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जरा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुकवर खास पोस्ट लिहित संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसाठी ‘निष्ठा’ दिवस आहे, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut’s birthday is ‘Loyalty’ day for Shivsainiks – Sushma Andhare

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना फेसबुक पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये सुषमा अंधारे (Sushma Andhare)  म्हणतात, “सन्माननीय संजय राऊत सर शिवसेनेचे चिलखत. आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी “निष्ठा”दिवस आहे… !!

लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते.

ही समष्टी ची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणु. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजुन उमजून सोयीस्कर रित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात.

अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे , प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे माञ मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.

सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती.. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सुड भावनेतून झालेल्या ED च्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही.

आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला… पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही ही उणिव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती.

सामना च्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत. सर, ज्यांना बहिण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कार च शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात.

… अधून मधून जेव्हा ट्रोलींग, दबावतंत्र या मुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते तेव्हा आम्ही आपला, आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्य्या वर्षावहिनी किंवा तुमच्या आईंनी जे सोसलं त्यापुढे हे काहिच नाही.

मध्ये नीलम गोऱ्हे आपली उपसभापती पदाची खुर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करुन गेल्या. पण आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना , मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते असे सांगीतले तेव्हा माञ निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणुन आनंदच व्यक्त केला हे उल्लेखनीय आहे.

सर , ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जिवाच्या आकांताने हा मातोश्रींचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे.

लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेल मधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही हा विचार करुन हार मानणारी शाऊटींग ब्रिगेड, अन् मातोश्री ने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात.  आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही