IND vs NZ | उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल? पाहा संभाव्य खेळाडूंची यादी

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: आज आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये हा सामना होणार आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)  हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते.

त्यानंतर आज पुन्हा एकदा हे दोन्ही संघ (IND vs NZ) एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे.

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून सर्व सामने आपल्या नावावर केले आहे.

अखेरच्या पाच साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाची प्लेइंग-11 सेम होती. संघात वारंवार बदल केल्यामुळे भारतीय संघाला फटका बसला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

अशात आज होणाऱ्या सामन्यासाठी (IND vs NZ)  भारतीय संघामध्ये कोणताही बदल होणार नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील सामन्यामध्ये संघात जे खेळाडू होते, तेच खेळाडू आज मैदानावर उतरतील, अशा चर्चा आहे.

List of probable players in Team India

आजच्या सामन्यासाठी (IND vs NZ) भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश असू शकतो.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe