IND vs SL | ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये कोण करणार एकदिवसीय मालिकेत विकेटकीपिंग?

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. 10 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू परतले आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल यांचा समावेश आहे. मात्र, कार अपघातामुळे ऋषभ पंत या मालिकेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे ऋषभ पंत या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेमध्ये भारतीय संघासाठी विकेटकीपिंग कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संघाकडे के एल राहुल आणि इशान किशन हे दोन पर्याय आहेत.

के एल राहुलकडे विकेटकीपिंगचा चांगला अनुभव आहे. बांगलादेश दौऱ्यावर त्याने भारतीय संघासाठी विकेटकीपिंग केली होती. पण तो दीर्घकाळापासून खराब फॉर्मला झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विकेटकीपिंग करण्याची संधी मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

इशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 210 धावांची तुफान खेळी खेळली होती. त्याचबरोबर त्याचे यष्टीरक्षण कौशल्यही उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विकेटकीपिंग करण्याची संधी मिळू शकते. इशान किशनने भारतीय संघासाठी आतापर्यंत दहा एक दिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केले आहेत.

भारतीय संघाकडे विकेटकीपिंग साठी दोन पर्याय आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा कुणाची यष्टीरक्षक म्हणून निवड करेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या