Sharad Pawar | काका-पुतण्याच नेमकं चाललय काय? शरद पवार अजित पवारांच्या घरी दाखल

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sharad Pawar | पुणे: देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. काल पवार कुटुंबाने देखील बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असं सवाल उपस्थित झाला होता. दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.

या चर्चा सुरू असताना अजित पवार गोविंद बागेत दाखल झाले. काल संध्याकाळी उशिरा अजित पवारांनी गोविंद बागेत सुरू असलेल्या कार्यक्रमाला सहकुटुंब हजेरी लावली. या सर्व घटनांनंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

काल अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत दाखल झाले होते. काल अजित पवारांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रतिभा पवार यांचा आशीर्वाद घेतला.

तर दुसरीकडे आज शरद पवार (Sharad Pawar) अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) भाऊबीजनिमित्त अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांची भेट झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) अजित दादांच्या घरी आले. भाऊबीज साजरी करण्यासाठी पवार कुटुंब अजितदादांच्या घरी जमलं असल्याच्या चर्चा सुरू आहे.

परंतु, यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Dilip Walse Patil and Amol Kolhe met yesterday

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील बडे नेते एकमेकांना भेटताना दिसत आहे. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भेटीसोबतच काल राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली.

अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांची काल भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीपूर्वी दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) निकटवर्तीय मानले जात होते.

अशात अजित पवार गटाचे नेते शरद पवार गटाच्या नेत्याला भेटल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe