IND vs NZ | उपांत्य फेरीमध्ये रोहित शर्माचा मोठा विक्रम; ख्रिस गेलल मागे टाकत केला रेकॉर्ड

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

IND vs NZ | मुंबई: आज मुंबई येथील वानखेडे मैदानावर आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे.

नाणेफेक जिंकत रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. या खेळी दरम्यान रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी करत इतिहास रचला आहे.

Rohit Sharma hit 50 sixes in World Cup

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) हा सामना सुरू असताना रोहित शर्माने पहिल्या 7 षटकामध्ये चार षटकार आणि चार चौकार लगावले आहे.

यानंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहास 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या खेळीनंतर रोहित शर्माने आक्रमक माजी फलंदाज ख्रिस गेल याचा वर्ल्डकपमधील सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान, आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामना सुरू आहे. या (IND vs NZ) सामन्यादरम्यान टीम इंडियात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

तर टीम न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ) केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe