Manoj Jarange | आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून घेणार – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | बीड: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्र दौरा करणार आहे. आजपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यादरम्यान बीडमध्ये दाखल होताच मराठ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं आहे.

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून घेणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाला जे विरोध करत आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी सभा घेतल्या तरी आमचं काही म्हणणं नाही.

कारण मुळात आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. सरकारच्या छाताडावर बसून आम्ही आमचं आरक्षण घेणारच आहोत. कारण मराठा समाज सगळे काम सोडून फक्त आरक्षणाला वेळ देताना दिसत आहे.”

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. सरकारने आता मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यायला हवं.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असं मी (Manoj Jarange) सांगितलं होतं. त्यानंतर आता कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत. आमच्या नोंदी जेव्हापासून सापडत आहे, तेव्हापासून मराठा समाजात उत्साहाचं वातावरण दिसत आहे.

एक मुलगा म्हणून मी माझ्या समाजासाठी प्रयत्न करत आहे. मराठा समाजाने त्यांचा नेता म्हणून माझी निवड केली असेल. मात्र, या सर्व गोष्टी मी नेता म्हणून नाही तर सेवक आणि माझं कर्तव्य म्हणून करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe