Zika Virus | नागरिकांनो सावधान! राज्यात आढळले 5 झिकाचे रुग्ण

Zika Virus | टीम महाराष्ट्र देशा: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांसाठी चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये झिकाचा संसर्ग वाढत चालला आहे.

राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून झिकाचे (Zika Virus) तब्बल पाच रुग्ण आढळून आले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

देशासह राज्यामध्ये झिकाचा (Zika Virus) संसर्गाचं वाढत चाललं आहे. त्वचेवर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, सांधेदुखी, ताप इत्यादी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कारण ही झिकाची (Zika Virus) साधारण लक्षणे आहेत. ही लक्षणे दोन ते तीन दिवसांपासून ते आठवडाभर टिकत असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5 cases of Zika have been found in Maharashtra since October

दरम्यान, राज्यामध्ये झिका (Zika Virus) संसर्गाचं प्रमाण वाढत चाललं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये झिकाचे तब्बल 5 रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये इचलकरंजीत 2, तर पुणे, पंढरपूर, कोल्हापूर या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. पुण्यातील झिकाचं प्रकरण येरवड्यातील प्रतीक नगरमध्ये उघडकीस आलं आहे.

64 वर्षीय महिलेला 5 नोव्हेंबरला झिकाची लागण झाली आहे. त्यामुळे ताप, व्हायरल इन्फेक्शन झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

तुम्ही यासाठी सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन उपचार (Zika Virus)  घेऊ शकतात. सरकारी दवाखाने मोफत उपचार प्रधान करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.