Share

Amla Benifits | हिवाळ्यामध्ये कच्चा आवळा खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Amla Benifits | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आवळा (Amla) सहज उपलब्ध असतो. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व आहे. अनेक औषधीमध्ये देखील आवळ्याचा उपयोग केला जातो. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर, फोलेट, अँटी अँक्सीडेंट, फॉस्फरस, आयरन, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम इत्यादी घटक आढळतात. त्यामुळे कच्च्या आवळ्याचे नियमित सेवन … Read more

Published On: 

Amla Benifits | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आवळा (Amla) सहज उपलब्ध असतो. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व आहे. अनेक औषधीमध्ये देखील आवळ्याचा उपयोग केला जातो. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर, फोलेट, अँटी अँक्सीडेंट, फॉस्फरस, आयरन, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम इत्यादी घटक आढळतात. त्यामुळे कच्च्या आवळ्याचे नियमित सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कच्च्या आवळ्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

कच्च्या आवळ्याला पॉलिफेनॉलचा चांगला स्त्रोत मानला जातो. पॉलिफेनॉल रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे नियमित कच्च्या आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

पचनसंस्था मजबूत राहते

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि विटामिन सी आढळून येते. फायबर आणि विटामिन सी पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. नियमित रिकाम्या पोटी कच्च्या आवळ्याचे सेवन केल्याने ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

हाडे मजबूत राहतात

कच्चा आवळ्यामध्ये माफक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. कॅल्शियम शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या आवळ्याचे सेवन केले पाहिजे. नियमित कच्च्या आवळ्याचे सेवन केल्याने स्नायूंशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

रक्त शुद्ध राहते

कच्च्या आवळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. परिणामी शरीरातील रक्त शुद्ध राहते. त्याचबरोबर आवळ्याचे नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते. म्हणून नियमित कच्च्या आवळ्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही