Raj Thackeray | “अशोक सराफ आज मुख्यमंत्री…” ; राज ठाकरेंच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Raj Thackeray | पुणे: पुण्यामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना राज ठाकरे यांनी अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. अशोक सराफ जर दक्षिण भारतामध्ये असते, तर आज ते तेथील मुख्यमंत्री असते, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले आहे.

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, “अशोक सराफ यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. यामध्ये नाटक, चित्रपट, टीव्ही सिरीयल या गोष्टींचा समावेश आहे. अशोक सराफ जर दक्षिण भारतात असते, तर ते मुख्यमंत्री असते. महाराष्ट्रामध्ये असं काही होत नाही. कलाकार आहे, ठीक आहे, एवढं बोलून आपल्याकडे विषय बंद केला जातो.”

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “परदेशामध्ये कलावंतांच्या नावाने विमानतळ असतात. तर आपल्याकडे चौकांना कलावंतांची नावे दिली जातात. कलाकाराची प्रतिमा जेवढी जपायला हवी, तेवढी आपल्याकडे जपली जात नाही. अशोक सराफ यांचा एक कलावंत म्हणून मी नेहमी आदर करत आलो आहे. अशोक सराफ आज युरोपमध्ये असते तर त्यांच्या स्वागतासाठी मंचावर प्रधानमंत्री असते.”

कोणताही चित्रपट असो किंवा नाटक असो अशोक सराफ यांनी कायम त्यांचा प्रभाव पडला आहे. समोर कोणताही कलाकार असू दे अशोक सराफ यांनी नेहमी त्यांची वेगळी छाप निर्माण केली आहे. मी त्या दिवशी अशोक सराफ यांचे व्हाक्युम क्लिनर नाटक पाहिलं. तर नाटकामध्ये त्यांच्या प्रवेशाला टाळ्यांचा कडकडाट झाला होता, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.