IND vs SL 1st ODI | ‘या’ ॲपवर फ्रीमध्ये बघता येईल श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

IND vs SL 1st ODI | टीम महराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. 10 जानेवारी पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेने भारत वनडे वर्ल्ड कप मिशनला सुरुवात करणार आहे. या एकदिवसीय मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुनरागमन करत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही मोबाईलमध्ये फ्रीमध्ये बघू शकतात.

बांगलादेश दौऱ्यामध्ये कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुखापतीतून सावरत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर या एकदिवसीय मालिकेमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल यांचा देखील समावेश आहे. या खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर गेल्या टी- 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेला जसप्रीत बुमराह देखील या मालिकेमध्ये पुनरागमन करत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना 10 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. दुपारी 1 वाजता या सामन्याची नाणेफेक होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एक दिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याचबरोबर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ टीव्हीवर विनामूल्य पाहू शकतात. तुमच्याकडे जर जिओ सिम असेल तर तुम्ही जिओ टीव्हीवर विनामूल्य या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे हॉटस्टार चे सदस्य असल्यास तुम्ही हॉटस्टार वर देखील हा सामना बघू शकतात.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe