Share

Rose Water | हिवाळ्यामध्ये गुलाब जलाने चेहरा कसा स्वच्छ करायचा?, जाणून घ्या पद्धती

🕒 1 min read Rose Water | टीम महाराष्ट्र देशा: गुलाब जल (Rose Water) आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधन उत्पादनामध्ये गुलाब जलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गुलाब जल नैसर्गिक पद्धतीने त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी फायदेशीर असते. अनेक लोक गुलाब जलपासून … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rose Water | टीम महाराष्ट्र देशा: गुलाब जल (Rose Water) आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधन उत्पादनामध्ये गुलाब जलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गुलाब जल नैसर्गिक पद्धतीने त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी फायदेशीर असते. अनेक लोक गुलाब जलपासून बनवलेले विविध उत्पादने वापरत असतात. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी नैसर्गिकरित्या गुलाब जल वापरू शकतात. गुलाब जलचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर याचा वापर आणि चेहऱ्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पुढील पद्धतीने गुलाब जलचा वापर करावा.

गुलाब जल आणि कोरफड

हिवाळ्यामध्ये चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि गुलाब जल यांचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा कोरफड जेलमध्ये दोन चमचे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ती दोन ते तीन मिनिटे चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. हिवाळ्यामध्ये नियमित गुलाब जल आणि कोरफड त्वचेला लावल्यास त्वचा मॉइश्चराईज राहते.

गुलाब जल आणि चंदन पावडर

हिवाळ्यामध्ये तुम्ही गुलाब जल आणि चंदन पावडर मिसळून चेहरा स्वच्छ करू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाब जल आणि चंदन पावडर एकत्रित मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर तुम्हाला हलक्या हाताने ते चेहऱ्यावर लावावे लागेल. हे मिश्रण पूर्णपणे सुकल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गुलाब जलसोबत मुलतानी मातीही लावू शकतात.

गुलाब जल आणि डाळिंबाच्या सालीची पावडर

गुलाब जलमध्ये डाळिंबाच्या सालीची पावडर मिसळून टाकल्यास चेहरा स्वच्छ राहू शकतो. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा डाळिंबाच्या सालीची पावडर गुलाब जलमध्ये मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तयार झालेल्या पेस्टने तुम्हाला चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटे स्क्रब करावे लागेल. व्यवस्थित स्क्रब करून झाल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाने स्क्रब केल्यावर तुमची त्वचा हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर या स्क्रबच्या वापराने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या