Sanjay Raut | अद्वय हिरेंची अटक हे राजकीय दबाव तंत्र – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे. शिक्षण भरती प्रकरणी अद्वय हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे.नाशिक जिल्हा बँकेचे 7 कोटि रुपयांचे हे कर्ज प्रकरण.

गिरना मौसम साखर कारखान्याचे 178 कोटीच्या अफरातफर प्रकरणात मंत्री दादा भुसे अडकले पण कारवाई नाही.भीमा पाटस साखर कारखाना दौंड येथे 500 कोटी चे money laundering.

पण भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई नाही.मंत्री मंडळात अनेक भ्रष्ट लोक जामिनावर आहेत. सहकारी बँकाचे अनेक थकबाकीदार सरकारात आहेत.

अद्वय हिरे यांनी मालेगावात सक्रिय राहू नये. मालेगाव विधान सभा निवडणुक लढू नये यासाठी राजकीय दबाव होता.हिरे झुकले नाहीत. त्यांना अटक झाली. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. लढत राहू आणि जिंकू. जय महाराष्ट्र!”

Advay Hiray was under pressure – Sanjay Raut

“अद्वय हिरे यांना अटक करून महाराष्ट्र सरकारने दाखवून दिलं आहे की ते सुडाचं आणि दबावाचं राजकारण करतात. अद्वय हिरे यांच्यावर दबाव होता की त्यांनी मालेगावमध्ये सक्रिय राहू नये.

मालेगावची विधानसभा त्यांनी लढवू नये नाही तर त्यांना त्रास होईल, असा देखील त्यांच्यावर दबाव होता. तो त्रास कोणता आहे? हे त्यांना अटक झाल्यावर स्पष्ट झालं आहे. मात्र, अद्वय हिरे हे एकटे नाही. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत”, असही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.