Vinayak Raut | अजित पवारांना पश्चाताप होत असून ते यातून मुक्त व्हायचा विचार करताय – विनायक राऊत

Vinayak Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. या घटनेनंतर विरोधक आणि सत्ताधारी अनेकदा आमने-सामने आले आहे.

अशात अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

अजित पवारांना आता पश्चाताप झालेला असून यातून कसं मुक्त व्हायचं? याचा ते विचार करत असल्याचं विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar met Amit Shah

विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, “अजित पवार हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचं काम केलं होतं.

त्यामुळे अजित पवार यांना आता पश्चाताप झालेला असून ते यातून कसं मुक्त व्हायचं? याचा विचार करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

आपल्याला मुख्यमंत्री करावं, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे अजित पवार गट आणि शिंदे पवार गट सत्तेत सामील झाला आहे.

परंतु, तुम्ही तीन तिघाडा काम बिघाडा अशी म्हण ऐकली असेल. महायुतीमध्ये डिसेंबर महिन्यात मोठा भूकंप होऊ शकतो. 31 डिसेंबर पूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होईल.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील बडे नेते एकमेकांना भेटताना दिसत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्र आले होते.

त्याचबरोबर शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांची देखील या आठवड्यात भेट झाली आहे.

या सर्व भेटीगाठीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं चाललय काय? असा सवाल देखील या सर्व घडामोडीनंतर उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.