Sharad Pawar | आमच्या भेटीचा अर्थ लवकरच कळेल; अजित पवारांच्या भेटीवर शरद पवारांचं सूचक वक्तव्य

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. पवार कुटुंब दरवर्षी बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येतं.

अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याचं बोललं जात होतं. परंतु, रात्री उशिरा अजित पवार सहकुटुंब या कार्यक्रमामध्ये दाखल झाले.

त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी शरद पवार (Sharad Pawar) अजित पवारांच्या निवासस्थानी गेले होते. या घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की चाललय काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The meaning of our visit will soon be known – Sharad Pawar

दोन पवारांची भेट झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय आहे? हे त्यांच्या भेटीनंतर कळत असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) विचारला.

यावर उत्तर देत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “होय! सर्वांना लवकरच आमच्या भेटीचा अर्थ कळेल. निवडणुकीचा निकाल लागताचं आमच्या भेटीचा अर्थ कळेल.”

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या सूचक विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

सत्तेत सामील होताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe