Raj Thackeray | अमित शाहांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलं; मोफत अयोध्या वारीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अयोध्या मंदिराच्या नावावरून पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर सर्वांना राम मंदिराचं दर्शन करायला घेऊन जाऊ, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाहांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलं असेल, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “अमित शाहांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलं असेल. निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी राम मंदिराचं आमिष कशाला दाखवता?

निवडणुका लढवायच्या असतील तर कुणी काय काम केली? यावर बोलून निवडणूक लढवा.” राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे (Raj Thackeray) पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र दिसत आहे.

Does Ramlalla belong to BJP? – Sanjay Raut

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव होताना दिसत आहे.

मध्यप्रदेशच्या लोकांनी भाजपला मत दिली तर त्यांना अयोध्यामध्ये मोफत दर्शन मिळेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

त्यांचं हे वाक्य अत्यंत घृणास्पद आहे. रामलल्ला भाजपच्या मालकीचा आहे का? त्यांनी रामलल्लाला राजकारणात फ्रीमध्ये आणलं आहे. मात्र, अयोध्या आणि रामलल्ला त्यांच्या मालकीचा नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.