Raj Thackeray | मनोज जरांगेंना कोण बोलायला सांगतंय? राज ठाकरेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Raj Thackeray | मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मनोज जरांगेंना कोण बोलायला सांगतंय? हे लवकरच कळेल, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांना धारेवर धरलं असल्याचं बोललं जात आहे.

Raj Thackeray commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मनोज जरांगे यांना बोलायला कोण सांगत आहे? त्यांच्या मागे कोण आहे? हे लवकरच समोर येईल.

कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव निर्माण होताना दिसत आहे.” राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे वक्तव्य शरद पवार यांच्याबद्दल केलं  असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

ते (Raj Thackeray) म्हणाले, “प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते. आपली जात आवडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारण असतात. स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे किंवा आपलेपणा असणे, हे महाराष्ट्रात आतापर्यंत घडत होतं.

मात्र, महाराष्ट्रामध्ये कधीच जातीवरून वाद होत नव्हते. परंतु, जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे, तेव्हापासून दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष करणं महाराष्ट्रात सुरू झालं आहे. महाराष्ट्रामध्ये जातिवाद सुरू झाला तर राज्याचा उत्तर प्रदेश आणि बिहार व्हायला वेळ लागणार नाही.”

महत्वाच्या बातम्या