Madhuri Dixit | माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू

Madhuri Dixit | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमी तिच्या नृत्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. परंतु, सध्या तिच्या चर्चेचं कारण वेगळं आहे.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारची चर्चा रंगली होती.

परंतु, तेव्हा माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) या चर्चांना पूर्णविराम दिला होता. राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असं म्हणत माधुरी दीक्षितने त्यावेळी चर्चा थांबवल्या होत्या. परंतु, आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं  आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

परंतु, भाजपमध्ये अशी कोणतीच चर्चा सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

Madhuri Dixit will contest Lok Sabha elections from BJP?

गणेश उत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांची त्यांच्यासोबत बैठक पार पडली.

या बैठकीनंतर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असं त्यावेळी बोललं जात होतं.

त्यावेळी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चा प्रवक्ता यांनी या बातम्या खोट्या असल्याच्या सांगत चर्चा थांबवल्या होत्या. अशात पुन्हा एकदा माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.