Sushma Andhare | भाजपची मदत करायची असेल तर ती उघडपणे करावी; सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचे कान टोचले

Sushma Andhare | मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

महाराष्ट्रामध्ये दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर सुरू झालं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपची मदत करायची असेल तर ती उघडपणे करावी, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे (Sushma Andhare) यांचा समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे  (Sushma Andhare) म्हणाल्या, “अशा पद्धतीने जे विधान करतात, त्यांच्यावर फार बोलू नये. मात्र, भारतीय जनता पक्षाची मदत करायची असेल तर ती उघडपणे करावी. कारण अडून मदत करण्याला काहीच अर्थ नाही.”

There were no disputes based on caste In Maharashtra – Sushma Andhare

दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला. राज ठाकरे म्हणाले, “राज्यामध्ये जातीवरून कधीच वाद होत नव्हते. मात्र, राज्यामध्ये स्वतःच्या जातीचा अभिमान असणे, स्वतःच्या जातीबद्दल आपलेपाणा असणे, या गोष्टी होत्या.

कारण प्रत्येकाला आपली जात आवडते आणि त्याची वेगवेगळी कारणे असतात. परंतु, महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष करणं महाराष्ट्रात सुरू झालं. स्वार्थी राजकारणासाठी लोक महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.