Prakash Ambedkar | अकोला: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज जालन्यामध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांना धारेवर धरलं.
यावर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती? असा संतप्त सवाल प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी उपस्थित केला आहे.
What was the need for Chhagan Bhujbal to challenge Manoj Jarange? – Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, “ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्यांच्या या षड्यंत्रावर पाणी फिरण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊ.
आज झालेल्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती? कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडून काय मिळणार आहे?”
महत्वाच्या बातम्या
- Haribhau Rathod | मनोज जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील – हरिभाऊ राठोड
- Sambhajiraje Chhatrapati | छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करा – संभाजीराजे छत्रपती
- Manoj Jarange | भुजबळांचं वय झालंय म्हणून ते काहीही बोलताय – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा नेते लय नमुनेबाज, ते ओबीसी नेत्यांना काय सुधारू द्यायचे – मनोज जरांगे
- Chhagan Bhujbal | माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न केलास, तर याद राख; भुजबळांचा जरांगेंना इशारा
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले