Raj Thackeray | जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; भुजबळ-जरांगे वादात राज ठाकरेंची उडी

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण मराठा आरक्षणामुळे तापलेलं आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

तर मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर काल ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

There is a fight between castes in Maharashtra

राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचं 27 जानेवारी 2018 साली काढलेलं एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.

“राजसाहेबांचं २७ जानेवारी २०१८ चं हे राजकीय व्यंगचित्र… महाराष्ट्रात आज जातीजातींमध्ये जी भांडणं लावली जात आहेत त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून काय म्हणाले असते तो विचार मांडण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी ह्या व्यंगचित्रातून केला आहे. व्यंगचित्र पहा आणि विचार करा !”, या कॅप्शनसह मनसेने राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचं व्यंगचित्र शेअर केलं आहे.

“अरे तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो आणि आज तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय! का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी. या रे माझ्या लेकरांनो, त्या चिखलातून बाहेर या”, असा संदेश राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ आमने-सामने आले आहे. त्यांच्या या वादामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाज पेटून उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.