Share

Manoj Jarange | मनोज जरांगेंचा बॅनर फाडल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल; FIR मध्ये भुजबळांचं नाव

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल ओबीसी समाजाचा जालना जिल्ह्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange )  यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ … Read more

Published On: 

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल ओबीसी समाजाचा जालना जिल्ह्यात मेळावा पार पडला.

या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange )  यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आरक्षणासंबंधीचे बॅनर फाडण्याचा उल्लेख केला होता.

यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर फाडण्यात आला आहे. हा बॅनर फाडल्याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

The banner with the photo of Manoj Jarange was torn down

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांचा फोटो असलेला बॅनर फाडण्यात आला आहे. यानंतर संदीप भाऊसाहेब औताडे यांनी अज्ञात व्यक्तिविरोधक गुन्हा दाखल केला आहे.

या एफआयआरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नागपूर मुंबई हायवेवर असलेल्या आरापुर शिवारातील गवळी शिवारा कमानीजवळ मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या साखळी उपोषणाचा बॅनर लावण्यात आला होता.

शुक्रवारी (17 नोव्हेंबर) हा बॅनर फाडण्यात आला आहे. यानंतर संदीप औताडे यांनी या प्रकरणावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या एफआयआरमध्ये छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. कारण जालना जिल्ह्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे.

महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे बॅनर काढा, असं विधान देखील छगन भुजबळ यांनी या मेळाव्यात केलं होतं. त्यावरून या एफआयआरमध्ये छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही