Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे.
त्यांच्या या आंदोलनानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे. राज्य शासन जिल्हा पातळीवर हे काम करत आहे. यानंतर राज्यात गेल्या 15 दिवसात 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये विदर्भात सर्वाधिक नोंदी आढळून आल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर ( Maratha Reservation ) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने सुरू केलं आहे. राज्यात गेल्या 15 दिवसात 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत.
यामध्ये मराठवाड्यात सर्वात कमी तर विदर्भात सर्वाधिक नोंदी आढळून आल्या आहे. विदर्भामध्ये 13 लाख 3 हजार 885 नोंदी आढळल्या आहे. एवढ्या नोंदी सापडल्यानंतर राज्य शासन राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ( Maratha Reservation ) देईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Why don’t we have reservations? – Maratha Reservation
दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीला ( Maratha Reservation ) ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.
“ओबीसी समाजामध्ये असलेल्या बहुतेक जाती शेती करतात. त्याचबरोबर मराठा समाज देखील शेती करतो. ओबीसी आणि आमचा व्यवसाय एकच आहे, मग आम्हाला आरक्षण ( Maratha Reservation ) का नाही?
न्यायालयाकडून आम्हाला डावरलं का जात आहे? या पार्श्वभूमीवर आम्हाला आरक्षण ( Maratha Reservation ) दिलं पाहिजे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे
- Maratha Reservation | माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; मराठा आरक्षणासाठी 9 वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
- Manoj Jarange | मनोज जरांगेंचा बॅनर फाडल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल; FIR मध्ये भुजबळांचं नाव
- Raj Thackeray | जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; भुजबळ-जरांगे वादात राज ठाकरेंची उडी
- Uddhav Thackeray | कमळाबाईच्या ओटीत शिरलेले ‘शिवसैनिक’ कसे? ठाकरे गटाचा खोचक सवाल