Share

Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे

🕒 1 min readManoj Jarange | सांगली: उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसलं. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध … Read more

Published On: 

🕒 1 min read

Manoj Jarange | सांगली: उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसलं.

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर काल जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

तर जरांगे ( Manoj Jarange ) यांनी देखील भुजबळांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे राज्यात दौरे करत आहे.

We should be given reservation – Manoj Jarange

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सांगली, विटा आणि इस्लामपूर या ठिकाणी भव्य सभा पार पडल्या.

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “ओबीसी समाजातील बहुतेक जाती शेती व्यवसाय करतात. त्याचबरोबर मराठा समाजही शेती करतो. या पार्श्वभूमीवर आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे.

आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? न्यायालयाकडून आम्हाला डावरलं का जात आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करू नका, असं आवाहन मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा समाजाला केलं होतं.

त्यानंतर देखील मराठा तरुण आपला जीव देताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एका 9 वीत शिकणाऱ्या तरुणीने मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. कोमल तुकाराम बोकारे, असं या तरुणीचं नाव आहे.

आई-बाबा मला माफ करा. मराठा समाजाला लवकर आरक्षण द्या, माझं बलिदान व्यर्थ जाऊ नका, असं तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!