Chhagan Bhujbal | नाशिक: राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.
या मुद्द्यावरून काल जालना जिल्ह्यामध्ये ओबीसींचा भव्य मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prakash Ambedkar should cooperate with us – Chhagan Bhujbal
छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला सहकार्य करायला हवं, अशी माझी त्यांना विनंती आहे. आम्ही कुठे चुकलो आहोत? हे त्यांनी आम्हाला सांगायला हवं.
राज्यात काय चाललं आहे? यावर त्यांना एकदा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. आम्हाला त्यांच्याकडून दूर ढकलण्याची अपेक्षा करत नाही.
राज्यामध्ये वेगवेगळ्या पदावर कामं करणारी जेवढी समजदार लोक आहेत, त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं सुद्धा ऐकून घ्या. आमचा आक्रोश काय आहे? हे त्यांनी समजून घ्यायला हवं. त्यानंतर आमचं चुकलं कुठं? याबाबत त्यांनी आम्हाला सांगायला हवं.”
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला होता. “मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, त्यांच्या या षडयंत्रावर आम्ही पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बैठकांचं आयोजन करू. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना मनोज जरांगे यांना आव्हान देण्याची काय गरज होती?” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाच्या मुद्द्यात येऊ नये – छगन भुजबळ
- Maratha Reservation | भुजबळांच्या विरोधानंतर अजित पवार गट ॲक्शन मोडमध्ये? मराठा आरक्षणासाठी पुण्यात बोलावली बैठक
- Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; जाळला त्यांचा पुतळा
- Manoj Jarange | जर मराठा समाजाच्या नोंदी नव्हत्या, तर आज या नोंदी सापडल्या कशा? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणून भुजबळ चलबिचल झालेय – मनोज जरांगे