Share

Maratha Reservation | भुजबळांच्या विरोधानंतर अजित पवार गट ॲक्शन मोडमध्ये? मराठा आरक्षणासाठी पुण्यात बोलावली बैठक

Maratha Reservation | पुणे: मराठा समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आले आहे. कारण मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर काल मराठवाड्यातील जालन्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तर दुसरीकडे … Read more

Published On: 

Maratha Reservation | पुणे: मराठा समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आले आहे. कारण मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर काल मराठवाड्यातील जालन्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील छगन भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाने मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन केलं असल्याच्या चर्चा सुरू आहे.

A meeting of Ajit Pawar group was held in Pune

मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडली.

मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांच्या मेळाव्यानंतर मराठा समाज आणखीन आक्रमक झाला आहे. यावरूनच या बैठकीचं आयोजन केलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होत चालला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या मागणीला ( Maratha Reservation ) विरोध केला आहे.

याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात संतप्त मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला आहे. छगन भुजबळांची मंत्री मंडळातून हकलपट्टी करा, अशी मागणी देखील मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा आंदोलकांच्या या कृत्यावर ओबीसी समाजाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही