Chhagan Bhujbal | संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाच्या मुद्द्यात येऊ नये – छगन भुजबळ

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chhagan Bhujbal | नाशिक: काल जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

संभाजीराजे छत्रपती यांच्या या मागणीवर छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाच्या मुद्द्यात येऊ नये, असं छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

We respect and honor Sambhajiraje Chhatrapati – Chhagan Bhujbal

छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती यांचा आम्ही आदर सन्मान करतो. आमच्यासाठी लढणाऱ्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसलेले आहात.

त्यामुळे तुम्ही एका समाजाचे नाही. तुम्ही या राज्याच्या प्रत्येक समाजाचे आहात. त्यामुळे तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलतात? एकतर तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये यायलाच नको. आणि आलाच तर तुम्ही सांगायला हवं की सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा.

कोणावरही अन्याय करू नका, असं तुम्ही सांगायला हवं. ज्यावेळी महाराष्ट्रात घरं जळतं होती, त्यावेळी तुम्ही गप्प बसलेला होता. असं करू नका म्हणणं, त्यावेळी तुमचं काम होतं.

ज्यांची घर जाळली गेली, त्यांचे अश्रू पुसणं तुमचं काम होतं. छगन भुजबळाला मंत्रिपदाची परवा नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. छगन भुजबळ नेहमी गोरगरिबांसाठी लढेल. महाराज तुम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीवर बसलेले आहात. त्यामुळे तुम्ही सर्वांना न्याय द्यायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe