Share

मुलीशी मैत्री का केली? भररस्त्यात अडवून नववीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

दिल्लीत शाळेतील मुलीसोबतच्या मैत्रीच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे.

Published On: 

Delhi Crime class 9 student stabbed to death over friendship with girl

दिल्ली (Delhi Crime): शालेय वयात मुलांमध्ये होणारे किरकोळ वाद आता किती भयंकर रूप घेत आहेत, याची एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. शाळेतील एका मुलीसोबत मैत्री असल्याच्या रागातून एका १५ वर्षांच्या मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळेच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास दिल्लीतील नांगलोई भागात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत विद्यार्थी हा इयत्ता नववीत शिकत होता. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत आणि इतर काही मित्रांसोबत घरी परतत होता. त्याचवेळी तीन मुलांनी त्यांना रस्त्यात अडवलं. त्यांनी थेट त्या मुलीलाच विद्यार्थ्यासोबतच्या मैत्रीवरून जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली आणि त्यानंतर तो विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत तिथून पुढे निघून गेला.

Class 9 student stabbed to death over friendship with girl

मुलीच्या मैत्रीवरून वाद; १५ मिनिटांतच जीवघेणा हल्ला

पण हा वाद तिथेच संपला नव्हता. अवघ्या १५ ते २० मिनिटांतच त्या तीन मुलांनी या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा रस्त्यात गाठलं. यावेळी त्यांनी मुलीसोबतच्या त्याच्या मैत्रीवरून पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या झटापटीदरम्यान त्या तीनपैकी एका अल्पवयीन मुलाने अचानक खिशातून चाकू काढला आणि विद्यार्थ्याच्या उजव्या मांडीवर सपासप वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या या विद्यार्थ्याला तिथेच सोडून तिन्ही आरोपींनी पळ काढला. त्यानंतर दुपारी १:५० च्या सुमारास सोनिया रुग्णालयातून नांगलोई पोलिसांना या घटनेचा कॉल आला. पोलीस तातडीने रुग्णालयात पोहोचले. पण चाकूचा वार खोल लागल्याने मुलाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यामुळेच उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही