🕒 1 min read
Manoj Jarange | पुणे: महाराष्ट्रातील वातावरण मराठा आरक्षणावरून चांगलंच तापलेलं आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.
त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भुजबळ आणि जरांगे ( Manoj Jarange ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा नाव न घेता छगन भुजबळ यांना धारेवर धरलं आहे.
मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आमचं हे आंदोलन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. हे आंदोलन सरकारशी वाद घालण्यासाठी नाही. तो म्हातारा माणूस आहे, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही.
As a person, I had never opposed Chhagan Bhujbal – Manoj Jarange
मात्र, त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला तर काही खरं नाही. व्यक्ती म्हणून मी छगन भुजबळ यांचा कधीच विरोध केला नव्हता.
त्याचबरोबर त्यांचे आणि माझे कधीच वाद नव्हते. मात्र, आता व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांना विरोध आहे. ते काहीही बोलत राहिले तरी आम्ही शांत राहणार आहोत. कारण त्यांच्याबद्दल मला सर्व काही माहित आहे.”
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठं आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.
सरकारने 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला दिला आहे.
तत्पूर्वी या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. अशात राज्य सरकार या मुद्द्यावर काय तोडगा काढेल? याबाबत आता चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात कुठं थंडी वाढणार तर कुठं ठिकाणी पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Manoj Jarange | भुजबळांसारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही – मनोज जरांगे
- Chhagan Bhujbal | प्रकाश आंबेडकरांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा – छगन भुजबळ
- Chhagan Bhujbal। ‘दूरी तीरी एक्का छगन भुजबळ छक्xxx; भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मराठा समाजाची मागणी
- Chhagan Bhujbal | संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाच्या मुद्द्यात येऊ नये – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











