Share

Weather Update | राज्यात कुठं थंडी वाढणार तर कुठं ठिकाणी पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काही ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला तर काही ठिकाणी थंडी वाढताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलताना दिसत आहे. अशात पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काही ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला तर काही ठिकाणी थंडी वाढताना दिसत आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलताना दिसत आहे. अशात पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वातावरण कोरडे राहणार असून थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे देखील हवामान खात्याकडून ( Weather Update ) सांगण्यात आले आहे.

Cold will increase in North Maharashtra and Vidarbha

राज्यामध्ये 23 नोव्हेंबर पर्यंत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने ( Weather Update ) वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढत आहे. त्याचबरोबर दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने ( Weather Update ) दिला आहे.

राज्यासह तामिळनाडू आणि केरळ मधील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागांमध्ये वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने ( Weather Update ) दिला आहे.

Benefits of Coriander

दरम्यान, या बदलत्या वातावरणात ( Weather Update ) आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामानात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबिरीचा समावेश करू शकतात.

कोथिंबीरीमध्ये आढळणारे गुणधर्म तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नियमित कोथिंबिरीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते, त्याचबरोबर हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित कोथिंबिरीचे सेवन करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही