Sanjay Raut | “सरकारमधल्या अतिशहाण्या मंत्र्यांनी कान कोरून…”; मुनगंटीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई : राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान देत डिवचलं होतं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगत असाल तर माझं आव्हान आहे की १५ मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावर संजय राऊत यांनी पलटवार करत चांगलंच सुनावलं आहे.

ते म्हणाले, “सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी जरा आपले कान कोरून यावेत. त्यांनी मला आव्हान दिलंय की मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. जरा कानमधले बोळे काढा. कान साफ करा, कानकोरणी हवी तर मी पाठवतो.”

दरम्यान , महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी झाली. मात्र गेल्या सुनावण्यांप्रमाणेच या सुनावणीलाही आता पुढची तारीख देण्यात आली आहे. “त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे, सगळं प्रेमाने होईल”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य काय?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी पडणार म्हटलं आहे. यावर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले मी संजय राऊत यांना सांगतो की त्यांनी फेब्रुवारी कशाला मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवावं. नाहीतर तुमचा बाळासाहेबांचा वारसा नकली असल्याचं सिद्ध होईल. हे सरकार फेब्रुवारीच्या पुढेही टिकलं तर संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत का? त्यांच्याकडचे कार्यकर्तेही टिकत नसल्याने संजय राऊत अशी वक्तव्यं करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :