Sanjay Raut | मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. भारतीय जनता पक्ष वर्ल्ड कप जिंकण्याच्या थाटात होता, असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.
Indian team has played very well – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “भारतीय संघ अत्यंत उत्तम खेळला आहे. ते हरले असले तरी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये खेळण्याची जिद्द होती.
त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या दुःखात मी ( Sanjay Raut ) सहभागी आहे. भारतीय संघावर मी ( Sanjay Raut ) वैयक्तिक टीका करणार नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष विश्वचषक जिंकण्याच्या थाटात होता.
भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला असता तर आनंद झाला असता. परंतु भारतीय जनता पक्षाकडून या सामन्यासाठी जे राजकारण करण्यात आलं होतं, जी व्यवस्था करण्यात आली होती, त्यावर दुर्दैवाने पाणी फिरलं आहे.
कपिल देव यांनी भारतीय संघाला सर्वप्रथम विश्वचषक जिंकून दिला होता. परंतु, काल झालेल्या सामन्यासाठी कपिल देव आणि त्यांच्या संघाला आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.
कारण कपिल देव त्या ठिकाणी उपस्थित असते तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, याला म्हणतात राजकारण.
ज्या प्रकारचे क्रिकेटच्या पडद्यामागे राजकारण सुरू आहे, त्याच्यावर या देशात भविष्यामध्ये नक्की चर्चा होईल. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. त्याचबरोबर दिल्लीला क्रिकेटचा माहोल असतो.
क्रिकेटचे मोठे अंतिम सामने मुंबईतच होतात, आतापर्यंत अशी देशात परंपरा होती. परंतु, यांना मुंबईतून सगळच गुजरातला खेचून न्यायचं आहे. उद्योगधंद्यांसह क्रिकेटही यांना गुजरातला घेऊन जायचं आहे. त्यांच्या या ओढतानीमुळे ही गडबड झालेली दिसते.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | कार्तिकी महापूजेवरून मराठ्यांचे दोन गट; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार की नाही?
- Vijay Wadettiwar | मी भुजबळांना सेनापती म्हटलेलं नाही; वडेट्टीवारांनी भुजबळ यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला?
- Manoj Jarange | मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला तर त्यांचं काही खरं नाही; जरांगेंचा भुजबळांना इशारा
- Weather Update | राज्यात कुठं थंडी वाढणार तर कुठं ठिकाणी पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Manoj Jarange | भुजबळांसारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही – मनोज जरांगे