🕒 1 min read
Maratha Reservation | पंढरपूर: 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो.
याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाचे दोन गट पडलेले दिसले आहे. कारण एका गटाने मराठा आंदोलनावरून ( Maratha Reservation ) ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला आहे. तर दुसऱ्या गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
The Sakal Maratha Committee started an indefinite strike
मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समितीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
यानंतर मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी पूजेला विरोध दर्शवला होता. मराठा समाज कालपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम होता.
मात्र, आज मराठा समाजाने ( Maratha Reservation ) आपली भूमिका बदललेली असून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी पूजेला आमचा विरोध नसल्याची भूमिका सकल मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष नागेश भोसले यांनी स्पष्ट केली आहे.
“राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडताना दिसत आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी यावे.
पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देणार असं त्यांनी जाहीर करावं”, असं नागेश भोसले यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामा सरकार जबाबदार असेल अशी भूमिका मांडली आहे.
अशात मराठा समाजाने मांडलेल्या या दोन्ही भूमिकेनंतर कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | मी भुजबळांना सेनापती म्हटलेलं नाही; वडेट्टीवारांनी भुजबळ यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला?
- Manoj Jarange | मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला तर त्यांचं काही खरं नाही; जरांगेंचा भुजबळांना इशारा
- Weather Update | राज्यात कुठं थंडी वाढणार तर कुठं ठिकाणी पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Manoj Jarange | भुजबळांसारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही – मनोज जरांगे
- Chhagan Bhujbal | प्रकाश आंबेडकरांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











